Ezekiel 7

अंत आला आहे

1परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला व तो म्हणाला. 2“मानवाच्या मुला, परमेश्वर देव इस्राएलाच्या भुमीला म्हणतो, या देशाच्या चारही बाजुचा शेवट झाला आहे.

3आता तुझा शेवट जवळ आला आहे, यास्तव मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करेल, त्यांच्या अपवित्र कामा वरुन मी त्यांचा न्याय करेल. त्यानंतर त्यांच्यावर घृणा आणेल. 4माझी दृष्टी तुमच्यावर दया करणार नाही, आणि मी तुमची गय करणार नाही, तुमच्या कामाचे वेतन तुम्हास देईन, तुमची घृणा मला येते, मग तुम्हाला कळेल मी परमेश्वर देव आहे.

5परमेश्वर देव हे सांगतो, अनर्थ! अनर्था मागे अनर्थ! पहा तो येत आहे. 6शेवट हा निश्चीत जवळ आला आहे, शेवट तुमच्यासाठी जागा झाला आहे, पहा तो येत आहे. 7रहीवाशी असलेल्या लोकांच्या भुमीवर सत्यानाश येऊन ठेपला आहे, हानी जवळ येण्याचा समय आला आहे, आणि कुठल्याही पर्वतावर हर्षभरीत ध्वनी ऐकू येणार नाही.

8आता जास्त काळ मी तुम्हाविरुध्द आपल्या त्वेषाने माझ्या रागाची ओतणी तुम्हावर करेल, जेव्हा मी तुमच्या कृत्याप्रमाणे न्यायाचा निकाल करेल आणि तेव्हा तुमचाच सर्व प्रकारचा घृणितपणा तुमच्यावर येईल. 9मी तुम्हाकडे करुणेने बघणार नाही, आणि तुझी गय मी करणार नाही, तुझ्या कामाची परतफेड तुझ्यावर होईल. तुम्हामध्ये घृणा वास करेल मग तुम्हाला समजेल मी परमेश्वर देव आहे. जो शिक्षा करणारा आहे.

10पहा! असे दिवस येत आहेत, जे घमंडाने भरलेल्या शिक्षेची काठी तुम्हावर येईल. 11क्रुरपणाची काठी दुष्टपणावर उगवेल त्यांच्या सर्वावर, त्यांच्यातल्या धनावर, त्यांच्या महत्वाच्या शेवटच्या इच्छा रहाणार नाही.

12वेळ, दिवस समीप येत आहे, हर्ष खरेदी न करो आणि दुःख विक्री न करो, तोपर्यंत माझा क्रोध सर्व बहुसंख्य लोकांवर रहाणार आहे. 13विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जावयाचा नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयी आहे, त्यातले काही ही चूकणार नाही, कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जिवीतास बळकटी आणणार नाही.

14ते तुताऱ्याचा नाद करतील आणि तयारी करतील तरी लढाई करण्यास कोणी तयार होणार नाही. तथापी माझा क्रोध पूर्ण समुदायावर आला आहे. 15इमारतीच्या आत तलवार आणि दुष्काळ, साथीचा रोग बाहेर आहे. जे शेतात आहेत ते तलवारीने मरतील, जो नगरात असेल त्याला दुष्काळ आणि साथीचा रोग त्यांचा नायनाट करेल. 16त्यांच्यातील काही जण बचावले जातील आणि पर्वतावर कबूतराप्रमाणे जातील, त्याच्या पातकामुळे ते कण्हत राहतील.

17प्रत्येक हात अडखळतील आणि प्रत्येक गुडघा पाण्याप्रमाणे कमजोर होईल. 18आणि ते अंगावर पोते गुंडळतील, त्यांच्यावर दहशतीचे सावट पसरेल; त्यांच्या चेहऱ्यावर लाज व डोक्यावर टक्कल पडेल. 19ते आपले सोने व चांदी रस्त्यावर फेकून देतील त्याचा त्याग करतील, त्यांचे सोनेचांदीही त्यांना परमेश्वराच्या क्रोधाच्या वाचवू शकणार नाही, त्यांच्या जीवाचा बचाव होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.

20ते त्यांच्या दागीण्यांवर घमंड करीत होते, त्यांच्या मूर्ती त्यांनी तिरकार आणणाऱ्या घृणा निर्माण करणाऱ्या तयार केल्या होत्या. तिरस्करणीय कार्य त्यांच्याशी केले आहे. म्हणून या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी अपवित्र केल्या आहे. 21आणि मी तिऱ्हाईतास हे सर्व लुट म्हणून वाटून देईन आणि पृथ्वी वरील वाईट लोकांना लुटून घेऊन देईन. ते ते भ्रष्ट करतील. 22मग मी माझे तोंड त्यांच्या महत्वाच्या ठिकाणापासून फिरवेल कारण यांनी माझे स्थान भ्रष्ट केले. लुटारू येऊन आत लुटालुट करतील.

23साखळी तयार करा, कारण भुमी रक्ताच्या न्यायाच्या निकालाने पूर्ण भरुन गेली आहे, शहर हिंसक बनले आहे. 24देशावर सर्वात दुष्ट लोक घेऊन येईल आणि ते त्यांची घरे बळकावून घेतील, आणि मी त्यांचा गर्व समाप्त करेल कारण त्यांनी पवित्र ठिकाण अमंगळ केली आहेत. 25भयभीत होतील, शांततेच्या शोधात ते भटकतील पण त्यांना ती सापडणार नाही.

26अनर्थावर अनर्थ येईल अफवावर अफवा पसरतील, मग ते संदेष्ट्याला संदेश पहाण्यासाठी सांगतील, दृष्टांत विद्या, सल्ला, वडीलांची बुध्दी संपून जाईल. राजा शोक करील, व राजकुमार निराशा परीधान करतील, तेव्हा भुमीच्या लोकांचे हात भितीने थरथरतील त्यांच्या कृत्याप्रमाणे हे त्यांच्याशी मी करेल, आणि मी त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या न्याय करेल जोपर्यंत त्यांना समजणार नाही मी परमेश्वर देव आहे.”

27

Copyright information for MarULB